मुख्य समाचार

6/recent/ticker-posts

आक्षेपार्ह रीलप्रकरणी संतोष पंडित यांना जामीन; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर दिलासा

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत समाजमाध्यमावरील रीलमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले संतोष गजानन पंडित (वय ४८, रा. नारायण पेठ) यांना पुणे न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

पंडित यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(१), ७५(२), ३५६(२) आणि ३५२, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेनंतर न्यायालयाने पंडित यांना प्रथम पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, पंडित यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर पुणे न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने घातलेल्या इतर अटी त्यांना लागू राहणार आहेत.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ